प्रबोधन वाचनालयाच्या वतीने गुरुवारी व्याख्यान
इचलकरंजी:
ख्यातनाम साहित्यिक कविवर्य वि. वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज जन्मदिन अर्थात मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला आणि ख्यातनाम मराठी साहित्यिक शंकर खंडू पाटील आणि शंकर बाबाजी पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रफिक सूरज हे
” ग्रामीण कथेचे दोन शिल्पकार” याविषयावर बोलणार आहेत. हे व्याख्यान गुरुवार ता. २६ फेब्रुवारी २०२६, सायं.६ वा. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे. तरी इचलकरंजी व परिसरातील साहित्य रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रबोधन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







