ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत स्वीकृत नगरसेवकांना प्रमाणपत्र प्रदान 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत स्वीकृत नगरसेवकांना प्रमाणपत्र प्रदान 

इचलकरंजी
 इचलकरंजी महानगरपालिका येथे नवनियुक्त स्वीकृत सदस्यांना निवडणूक प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम  उत्साहात पार पडला.
दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झालेल्या प्रकाश दत्तवाडे, संजय कांबळे, इम्रान बागवान, अविनाश कांबळे, मारुती पाथरवट आणि इम्रान हावेरी या सहा सदस्यांना महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकदिलाने कार्य करण्याचे आवाहन केले. वाढत्या शहरी गरजांचा विचार करून लोकाभिमुख निर्णय घेत विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहरातील विविध विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे सांगितले. इचलकरंजीची वाढती लोकसंख्या लक्षात घेता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांना किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता राहील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सभागृह नेते विठ्ठल चोपडे, विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील तसेच नगरसेवक मनोज हिंगमिरे, राजू बोंद्रे, सतीश मुळीक, संतोष शेळके, नितेश पोवार,मनोज साळुंखे, शशिकांत मोहिते, नागेश पाटील, म्हाळसाकांत कवडे, अहमद मुजावर, शेखर शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त सदस्यांच्या निवडीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

स्वीकृत नगरसेवकांना प्रमाणपत्र प्रदान करताना महापौर उदय धातूंडे व आयुक्त पल्लवी पाटील

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा