कन्या महाविद्यालयात ‘लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम’वर हँडस् ऑन ट्रेनिंगचे आयोजन
इचलकरंजी
इचलकरंजी येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागामार्फत ‘लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम’ या विषयावर एका हँडस् ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते. ‘मनोरमा स्मॅक सोल्यूशन’ कंपनी, कोल्हापूर येथील मार्केटिंग प्रमुख श्री शैलेंद्र मोहिते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयातील स्मार्ट क्लासरूम अंतर्गत बसवण्यात आलेल्या बेंक्यू मॉनिटर द्वारे ‘लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम’ संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. बेंक्यू मॉनिटर हाताळणी, तसेच त्यामधील विविध एप्लीकेशन्स यांचा योग्य वापर व त्याद्वारे अध्ययन अध्यापन प्रक्रिया अद्यावत पद्धतीने कशी करता येते तसेच विद्यार्थ्यांना विविध ज्ञान स्त्रोत एल एम एस च्या माध्यमातू सहजपणे कसे उपलब्ध करून देता येतील याबद्दल प्रात्यक्षिकासह उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक प्रा. वर्षा पोतदार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुनील गुरव (आयक्यूएसी सहसमन्वयक) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शाहीन फकीर यांनी केले. महाविद्यालयातील सिनियर तसेच ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना शैलेंद्र मोहिते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800