ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूर पोलीस ठाण्यात मारहाण व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूर पोलीस ठाण्यात मारहाण व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

इचलकरंजी
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे मतदान केंद्रावर झालेल्या वादातून शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीच्या प्रकरणी शहापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रणजित शामराव माने (वय ४५, व्यवसाय शिक्षक, रा. जी. के. नगर, तारदाळ ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१० वाजण्याच्या सुमारास जी. के. नगर, तारदाळ येथील अंगणवाडीमधील बूथ क्र. १३ येथे आरोपी तानाजी बापू तेलवे हे चित्रीकरण (रेकॉर्डिंग) करत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी “रेकॉर्डिंग का करत आहात?” असा जाब विचारला असता आरोपी विनोद दत्तात्रय कोराणे, शिवराज विनोद कोराणे व इतरांनी “तू कोण विचारणारा?” असे म्हणत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर आरोपींकडून आणखी काही व्यक्तींना बोलावण्यात आले. विश्वनाथ बाबासो माजरे, अधिक रघुनाथ जगताप तसेच ८ ते १० अनोळखी इसम घटनास्थळी येऊन फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करत अंगावर धावून आल्याचे नमूद आहे.
या प्रकरणी यापूर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल होता. त्याबाबत न्यायालयाची परवानगी घेऊन चौकशी पूर्ण केल्यानंतर दिनांक २ मार्च २०२६ रोजी नियमित गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद पोहेकॉ. बागर यांनी केली असून पुढील तपास पोहेकॉ. कोष्टी करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा