ICHMH51NEWS.IN
9921600800

वस्त्रोद्योग धोरणात येवला व पैठणी साड्यांसाठी तरतूद करा-खा.धनंजय महाडिक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वस्त्रोद्योग धोरणात येवला व पैठणी साड्यांसाठी तरतूद करा-खा.धनंजय महाडिक

नवी दिल्ली-
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेऊन महाराष्ट्रातील हातमाग व्यवसायावर चर्चा केली. यावेळी सौ. अरुंधती महाडिक व मा. रसिका वाकळकर उपस्थित होत्या.
देशभरातील हातमाग विणकरांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कारागिरी साजरी करण्यासाठी तसेच स्वदेशी आंदोलनाची आठवण जतन करण्यासाठी भारतात दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा केला जातो. हातमाग क्षेत्राबद्दल आणि भारताच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून हा दिवस साजरा केला जात आहे.
पुढील ५ वर्षाचे वस्त्रोद्योग धोरण तयार करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक येवला व पैठणी साडीचा समावेश करण्यात यावा, अशी विनंती यावेळी त्यांना केली. मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आतापर्यंत कापड क्षेत्रातील नवनवीन संशोधन करून या क्षेत्राचा विकास केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हातमाग क्षेत्रासाठी केंद्र सरकार नक्कीच प्रयत्न करेल, असा विश्वास वाटतो असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा