ICHMH51NEWS.IN
9921600800

विश्व अग्निहोत्र दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विश्व अग्निहोत्र दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

इचलकरंजी :
गोसंवर्धनी अग्निहोत्र ट्रस्टतर्फे १२ मार्च ‘विश्व अग्निहोत्र दिन’ निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सकाळी ९ ते १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ मार्च हा दिवस संपूर्ण जगात ‘विश्व अग्निहोत्र दिवस’ म्हणून साजरा केला जातो. इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन वेदिक सायन्सेस (वेदविज्ञान अनुसंधान संस्था), शिवपुरी-अक्कलकोट, जि. सोलापूर या संस्थेमार्फत या उपक्रमाची संकल्पना प्रसारित करण्यात आली असून त्यानुसार इचलकरंजी येथेही हा दिवस साजरा केला जाणार आहे.
या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास संस्थेतर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मोहनलीला गोशाळा, श्रीरामनगर, तीन बत्ती चार रस्ता, इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आला असून इच्छुकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
तसेच सायंकाळी ६ ते ७ या वेळेत (सूर्यास्त सुमारे ६.३८ वाजता) अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक संस्थेच्या जागेवर तसेच शहरातील काही मंदिरांमध्ये करण्यात येणार आहे. पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यास, वायुमंडळ व मनशुद्धीसाठी अग्निहोत्र हे प्रभावी साधन मानले जाते आणि अनेक देशांमध्येही या उपक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे.
गोसेवा व अग्निहोत्राचा प्रसार-प्रचार करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून अग्निहोत्रासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे, माहितीपर पुस्तके देणे तसेच समाजोपयोगी व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेणे अशा विविध उपक्रमांत संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा