इचलकरंजी महानगरपालिकेचे २०२६-२७ चे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे वार्षिक अंदाजपत्रक तसेच २०२५-२६ चे दुरुस्त अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले. या संदर्भात स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. प्रशासनाकडून दिनांक ९ मार्च रोजी अंदाजपत्रक सभापतींकडे सादर करण्यात आले होते.
बैठकीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी अंदाजपत्रकाचा सविस्तर आढावा घेत सदस्यांना माहिती दिली. यानंतर अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा करण्यात आली. काही बाबींमध्ये तरतूद वाढविण्याची तर काही ठिकाणी खर्चात कपात करण्याची सूचना स्थायी समिती सदस्यांनी केली.स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर हे अंदाजपत्रक पुढील निर्णयासाठी महासभेसमोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्तांच्या उपस्थितीत स्थायी समितीची बैठक पार पडली
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







