ICHMH51NEWS.IN
9921600800

कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा; मनपा प्रशासनाचे परिपत्रक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा; मनपा प्रशासनाचे परिपत्रक

इचलकरंजी :
शहरातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. कामकाजाच्या वेळेत काम सोडून गप्पा मारणे किंवा मोबाईल पाहत वेळ घालविणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ निलंबन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत उपआयुक्त विद्या कदम यांनी परिपत्रक जारी केले आहे.
महापौरांनी १३ मार्च रोजी शहरातील स्वच्छतेच्या कामाची अचानक फिरती करून पाहणी केली. या पाहणीत रस्ते व गटारी स्वच्छतेसाठी नियुक्त काही सफाई कर्मचारी थोडावेळ काम करून उर्वरित वेळ गप्पा मारणे किंवा मोबाईल पाहण्यात घालवत असल्याचे निदर्शनास आले. तसेच या कर्मचाऱ्यांवर मुकादम किंवा स्वच्छता निरीक्षक यांचे प्रभावी नियंत्रण नसल्याचेही आढळून आले. रस्ते व गटारी स्वच्छतेसाठी मक्तेदारांकडून पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामावरही योग्य नियंत्रण दिसून येत नसल्याबाबत महापौरांनी नाराजी व्यक्त केली.
याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने संबंधित विभागांना कडक सूचना दिल्या आहेत. शहर स्वच्छतेसाठी नियुक्त कर्मचारी कामाच्या वेळेत नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त गप्पा मारताना किंवा मोबाईल पाहत वेळ घालवत असल्याचे आढळल्यास संबंधित सफाई कर्मचारी, मुकादम आणि स्वच्छता निरीक्षक यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून तात्काळ निलंबन करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
तसेच विभागप्रमुखांनी हे परिपत्रक सर्व मुकादम, स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यांची स्वाक्षरी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा