ICHMH51NEWS.IN
9921600800

बहुजनांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य समर्पित केलेले कर्मयोगी म्हणजे डॉ.बापूजी साळुंखे…..प्रा.संदीप पाटील श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखेना ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन….

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बहुजनांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य समर्पित केलेले कर्मयोगी म्हणजे डॉ.बापूजी साळुंखे…..प्रा.संदीप पाटील
श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखेना ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन….
इचलकरंजी
येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांना ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब,बहुजन,कष्टकरी वर्गाला ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्काराचे धडे देणारे बापूजी,
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे,हे आपल्या कृतीतून दाखवून देणारे बापूजी आणि बहुजनांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे म्हणजे आम्हा सर्व गुरुदेव कार्यकर्त्याचे अखंड प्रेरणास्थान आहेत,
असे प्रतिपादन यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.संदीप पाटील यांनी  केले.
महाविद्यालयातील प्रो.डॉ.त्रिशला कदम यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ विठ्ठल नाईक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. धीरज शिंदे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रा.एकता जाधव यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व आजी-माजी गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा