कन्या महाविद्यालय गृहविज्ञान विभागातील विद्यार्थिनींनी केली स्तनपाना विषयी जनजागृती.
इचलकरंजी
बालकांना बाटलीने दूध पाजण्याचे प्रमाण वाढत असल्याने बालकांचे कुपोषित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. म्हणूनच युनिसेफ व भारत शासनाच्यावतीने स्तनपान विषयी जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने 1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या सप्ताह निमित्त दिनांक 6 ऑगस्ट रोजी गर्भवती व स्तनदा माता यांच्यामध्ये स्तनपानाची गरज व महत्त्व जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, कबनूर यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबवण्यात आला.
श्रीमती आक्कताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी गृहविज्ञान विभागातील बी.ए.भाग 3 मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनींनी साठे नगर कबनूर येथील गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांना स्तनपानाचे गरज व महत्त्व, स्तनदा मातेचा आहार याविषयी मार्गदर्शन केले व स्तनपानाविषयी जनजागृती केली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांचे प्रोत्साहन मिळाले.
तसेच विद्यार्थिनींना गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा.संगीता पाटील,प्रा. स्वाती हाळवणकर व आशा वर्कर सुनीता डांगे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









