जागतिक स्तनपान सप्ताह च्या वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा व पथनाट्य 
इचलकरंजी
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा दरवर्षी जगभरात “जागतिक स्तनपान सप्ताह’’ म्हणून साजरा केला जातो. हा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना सत्न्पानाचे फायदे आणि आवश्यकतेबद्दल जागरूक करणे हा आहे. तसेच दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह हा वेगवेगळ्या थीम अंतर्गत साजरा केला जातो या थीम वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्फीडिंग अक्शन द्वारे निवडली जाते. या वर्षी, या सप्ताहाची थीम “क्लोजिंग दि गॅप – ब्रेसफीडिंग फॉर ऑल ‘’ असे आहे याचा अर्थ सर्वच स्तरावरील मातांसाठी स्तनपान सुलभ करणे हा या वर्षाचा उद्देश आहे.
याच पार्श्वभूमीवर आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आज पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. स्तनपानाचे महत्व आणि त्याचे बाळाला होणारे फायदे व गरोदर मातांमध्ये जागरूकता निर्माण होण्यसाठी आज रुग्णालयातील अधिपरिचारिका श्रींम. भारती पोतदार सिस्टर उपस्थित गरोदर मातांना मार्गदर्शन केले. तसेच बाह्यरुग्ण विभागातील टीमने पथनाट्य सादर केले.तसेच एक छोटस गाण सादर केले. यावेळी घेण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शन चे निरीक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ नंदकुमार बनगे सर व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
याकार्यक्रमप्रसंगी रुग्णालायचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी सर केयर कॅम्पिनियन चे प्रोग्राम मॅनेजर सौरभ सर रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीम. चारुशिल्पा येमल मॅडम सहा.अधिसेविका श्रीम. सीमा कदम मॅडम रुग्णालयातील सर्व परिसेविका अधिपरिचारिका रुग्णालयीन कर्मचारी रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाह्यरुग्ण विभागाच्या अधिपरिचारिका श्रीम. सोनाली म्हेत्रे यांनी केले तसेच बाह्यरुग्ण विभागाच्या परिसेविका श्रीम. रोहिणी चंदनशिवे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









