इचलकरंजीत ड्रेनेज साफसफाईसाठी अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनची भर, ६ महिन्यांनी वापरात
इचलकरंजी:
शहरातील ड्रेनेज व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेला खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीन प्राप्त झाले आहे. या नवीन यंत्रामुळे ड्रेनेज लाईनमधील अडथळे दूर करणे, मैला व सांडपाणी शोषून घेणे तसेच गाळ काढणे ही कामे अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने करता येणार आहेत.
सदर मशीनचे पूजन आज उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि शिवसेना गटनेते रवींद्र माने यांच्या हस्ते पार पडले. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक व परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी नगरसेवक योगेश पाटील, सयाजी चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अजितमामा जाधव, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहायक आयुक्त राम कांबळे, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिकेला मिळालेल्या या यंत्रामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून, ड्रेनेज समस्यांवर प्रभावी तोडगा निघण्यास मदत होणार आहे.
मशीन सहा महिन्यांनी वापरात
सदर मशीन ६ महिन्यांनी वापरात घेतली गेली आहे,मनपा सभेत नुकताच प्रभार स्वीकारलेल्या संजय शेटे यांनी ६ महिने मशीन येऊन झाले परंतु खासदारांची तारीख न मिळाल्याने उदघाटन लांबल्याचा खुलासा केल्याने प्रशासनास धारेवर धरण्यात आले होते,त्यानंतर आज उद्घाटन सोपस्कार पार पाडण्यात आले
जेटिंग मशीनचे उद्घाटन करताना रवींद्र माने,सतीश मुळीक, अनिल डाळ्या
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







