ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ई-बस सेवा लवकरच सुरू करण्याचे संकेत; परिवहन समितीची बैठक संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ई-बस सेवा लवकरच सुरू करण्याचे संकेत; परिवहन समितीची बैठक संपन्न

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका परिवहन समितीची ई-बस सेवा सुरू करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत शहरात ई-बस सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बस सेवा मार्ग निश्चिती, बस थांबे निश्चित करणे व उभारणी, तिकीट दर ठरविणे, ई-बस स्थानक उभारणे तसेच आवश्यक पदभरती आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीनंतर उपमहापौर अनिल डाळ्या, सभापती अरुणा बचाटे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी ई-बस स्थानकास भेट देऊन पाहणी केली. ई-बस सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी मागासवर्गीय समिती सभापती रुबन आवळे, प्रभाग समिती सभापती नंदकुमार पाटील, नगरसेवक संतोष शेळके, ओंकार सुर्वे, सयाजी चव्हाण, नगरसेविका सुरेखा जाधव, शशिकला कवडे, समिती सदस्य अरुण कुंभार, उपायुक्त नंदू परळकर, प्रमोद बचाटे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर आदी उपस्थित होते.
ई-बस सेवा सुरू झाल्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व पर्यावरणपूरक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बैठकीत चर्चा करताना सभापती अरुणा बचाटे, नंदकुमार पाटील उपायुक्त नंदू परळकर
पाहणी करताना स्थायी समिती सभापती सतीश मुळीक व परिवहन समिती सदस्य
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा