शहापूरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणार,नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात-पो.नि गजेंद्र लोहार
इचलकरंजी
शहपूरातील गुन्हेगारीवर पूर्णपणे कायदेशीर रित्या नियंत्रण ठेवण्यात येईल असे पो.नि गजेंद्र लोहार यांनी सांगितले.पदभार स्विकारल्यावर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.मोक्यातील जामीनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष असून त्यांनी कोणतेही गुन्हे केल्यास त्यांचे जामीन रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात येईल.खाजगी सावकारी बाबत नागरिकांनी तक्रार देण्यास पुढे यावे,सहकार खात्याची मदत घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.यंत्रमाग व्यवसायातील नॉटिंगच्या ठेकेदारी प्रकरणात व्यावसायिकांनी निर्भयपणे पुढे यावे त्या क्षेत्रातील दहशत मोडून काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.वादातीत जागेचे व्यव्हार तसेच कर्जप्रकरणाबाबत कारवाईत अडथळे आणणाऱ्याची गय केली जाणार नाही,पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास व्यक्तीला दुसऱ्यांदा यावे लागणार नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगतांना नागरिकांच्या हितासाठी पोलीस ठाणे व सर्व कर्मचारी चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





