ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावरील छाप्यात ३४ जणावर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई,५.९१ लाखाचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावरील छाप्यात ३४ जणावर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई,५.९१ लाखाचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी :
 शहरातील आवळे मैदान परिसरात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मालकासह ३४ जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेश अशोक पाटील यांच्या फिर्यादीनुसार, तानाजी विष्णु आवळे याने स्वतःच्या मालकीच्या बंदिस्त खोलीत जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्या ठिकाणी आरोपी एकत्र येऊन “अंदर-बाहर” हा जुगार खेळत होते.
या कारवाईत पोलिसांनी ऋषीकेश दत्ता यादव, गुरुराज सुरेश गोडीकर, विक्रम संजय कुलकर्णी, संदीप बाबूराव कौळकर, विनोद कुवाल शेख, चिलम प्रकाश पाटील, उमेश बाबूराव खाडे, विशाल आप्पासो खोत, राहुल वसगौडा पाटील, संग्राम कृष्णात पाटील, आरिफ ताजुद्दीन शेख, नितीन मोहन शिंदे, राचिक इब्राहिम मुतवली, शाहरुख मुसा शेख, तौफिक शब्बीर पटवेगार, बापू सर्जेराव सलगर, संकेर तिमली आवळे, अक्षय राजगोंडा पाटील, महंमद गुलाब नदाफ, विजय दत्तात्रय आळंदे, रमेश कृष्णाजी डोईफोडे, मस्तान बुडन तहसीलदार, सर्फराज गुलाब चाऊस, भरत जोतिराम सूर्यवंशी, राजू बापू हेदुरे, पार्थ किरण काकडे, मेहयूब रमजान वुडचीकर, राजाराम मास्ती वडर, उमेश राजाराम मोटे, स्वप्निल शामराव कुंभार, जॉय येहजेकल घाटगे, अहमद सादिक इनामदार आणि योहान देवानंद लोखंडे यांना ताब्यात घेतले.
छाप्यात सुमारे ५.९१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सुमारे २.०९ लाख रुपये रोख रक्कम, २.९३ लाख रुपये किमतीचे २८ मोबाईल हँडसेट तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते यांचा समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेष गोरे, नवनाथ कदम, सागर चौगले, महेश खोत यांच्यासह पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा