रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप.
इचलकरंजी
इचलकरंजी रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब व नारायण दामोदर भंडारी फौंडेशन व रोटरी क्लब आँफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहर व परीसरातील गरजु विद्यार्थी-विद्यार्थीनीना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम रोटरी भवन येथे नुकताच संपन्न झाला* रोटरी क्लब आँफ इचलकरंजी सेंट्रल चे अध्यक्ष श्री घनश्याम सावलानी व नारायण दामोदर भंडारी फौंडेशन चे ट्रस्टी श्री यतिराजजी भंडारी व सेक्रेटरी श्री प्रा. अमर कांबळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते, अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते हे होते
प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार बाबासाहेब हावले व बाबासाहेब पाटील जांभळीकर यांच्या हस्ते करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष श्री सुनिल कोष्टी यांनी करत असताना या वर्षी प्रथमच दोन वेळा सायकलचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.यासाठी नारायण दामोदर फाउंडेशनचे व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर सायकलीसाठी क्लबच्या वतीने अर्थसहाय्य करणारे बाबासाहेब हावले, बाबासाहेब पाटील, सुजाता कोईक,अण्णासाहेब नंदाई ,माया होगाडे यांचेही मनापासून आभार व्यक्त केले व सत्कार करण्यात आला. प्रमुख मान्यवर यतीराज भंडारी व घनश्यामजी सावलानी यांनी मनोवत व्यक्त करत असताना रोटरी प्रोबसच्या कामाचे कौतुक केले व भविष्यात अधिक आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्राध्यापक अमर कांबळे यांनी रोटरी समाजातील दुर्लभ व गरजू लोकांना कायमच मदतीचा हात देत असून या कार्याचा गौरव केला. यावेळी ज्याना सायकल मिळालेल्या विद्यार्थीच्या पालकांनी श्रीमती मोरे, रमेश सुतार ,बगाडे यांनी रोटरी मुळे आपल्या मुलांना सायकली मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी सेक्रेटरी किरण कटके यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमास शिवबासु खोत, ऍड.विश्वासराव चूड, डॉक्टर कुबेर मगदूम, विजय पवार, वैभव डोंगरे, प्राजक्ता होगाडे ,जयश्री चौगुले, संगीता लडगे, निर्मला मोरे, राजश्री वाटगावे ,विना श्रेष्ठी ,गजानन शिरगुरे ,दशरथ मोहिते, बापूसाहेब घुले, डेझी कुरणे ,सुरेखा खोंद्रे ,आनंदी हजारे, कैलास तिवारी इत्यादी क्लब मेंबर सह , विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख त्यांनी देशमाने यांनी केले.
सायकल वितरण समारंभात रोटरीचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





