ICHMH51NEWS.IN
9921600800

इ.११ वी केंद्रीय प्रवेश नोंदणीस प्रारंभ; विद्यार्थिनींसाठी मोफत सुविधा उपलब्ध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इ.११ वी केंद्रीय प्रवेश नोंदणीस प्रारंभ; विद्यार्थिनींसाठी मोफत सुविधा उपलब्ध

इचलकरंजी :
 येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस दि. १० एप्रिलपासून प्रारंभ झाला असून विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्राथमिक नोंदणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी दिली. इचलकरंजी परिसरातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घेऊन कला व वाणिज्य शाखांमध्ये प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.
महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, स्वतंत्र अभ्यासिका, संगणक लॅब, वाचन कट्टा, क्रीडांगण तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांसारख्या सुविधा उपलब्ध असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘निर्भया पथक’ व ‘सखी सावित्री मंच’ यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच मुलींसाठी मोफत एस.टी. पासची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी संबंधित विभाग प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन ज्युनिअर विभाग प्रमुख श्रीमती एस. आर. बोरगावकर यांनी केले आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे : एकता जाधव – 9921136852, मनिषा गवळी – 8626050429, सुप्रिया पाटील – 9689714522, सुरजकुमार शिंदे – 9730159377, अनुराधा देशटवार – 9423591842, स्मिता साळुंखे – 9764059099, प्रकाश मुडशी – 9975728898, दत्तात्रय घाटगे – 9975332070, नयना कणसे – 9764213584 तसेच ज्युनिअर विभाग प्रमुख एस. आर. बोरगावकर – 9561583738. विद्यार्थिनींनी लवकरात लवकर नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा