ICHMH51NEWS.IN
9921600800

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात २०२९ साठी सज्ज होण्याचे जयशंकर पाठक यांचे आवाहन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात २०२९ साठी सज्ज होण्याचे जयशंकर पाठक यांचे आवाहन

इचलकरंजी:

भाजप सरकारवर टीका करत २०२९ च्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन काँग्रेसचे पक्ष निरीक्षक जयशंकर पाठक यांनी केले. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत हा मेळावा पार पडला. प्रारंभी शहराध्यक्ष संजय कांबळे व इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी मान्यवरांचा सत्कार करत पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना जयशंकर पाठक यांनी भाजपवर जाती-पातीच्या राजकारणाचा आरोप करत “अच्छे दिन”च्या घोषणांनंतरही महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त असल्याचे सांगितले. देशाचा इतिहास काँग्रेसचा असून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी पक्ष अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच २०२९ मध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनीही काँग्रेसच्या इतिहासाचा उल्लेख करत पक्षाने नेहमीच देशहिताचे राजकारण केल्याचे सांगितले. सध्या पक्ष संक्रमणाच्या टप्प्यात असून पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संघटनात्मक निवड प्रक्रिया लोकशाही पद्धतीने राबवली जात असून इचलकरंजीला जिल्हा काँग्रेसचा दर्जा मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, उद्धव ठाकरे शिवसेनेचे तारदाळ येथील चेतन आगलावे यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

या मेळाव्यास राहुल गायकवाड, विनायक घोरपडे, नंदकुमार कुंभार, नगरसेविका स्वाती लोखंडे, स्मिता तेलनाडे, भुषण शहा, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, सोहेल बाणदार, रविराज पाटील, ताजुद्दिन खतिब, पवन शिंदे, प्रमोद नेजे, अमोल पाटील, शिवा चव्हाण, नामदेव कोरवी, प्रशांत भिवरे, रवी वासुदेव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात बोलताना पक्ष निरीक्षक जयशंकर पाठक

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा