इचलकरंजीत मंगळसूत्र हिसकावण्याची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी :
शहरातील पंचवटी टॉकीज परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौ. भगवती सुरज तिवारी (वय ३५, रा. विवेकानंद कॉलनी, शाहू पुतळ्याजवळ, इचलकरंजी) या दिनांक १६ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीसोबत घरी परत येत होत्या. यावेळी पंचवटी टॉकीजजवळ एका अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे १ तोळे वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला.
या घटनेत सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साने हे करत असून पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





