ICHMH51NEWS.IN
9921600800

दुसऱ्या दिवशीही इचलकरंजीत अतिक्रमणांवर कारवाई; जेसीबीद्वारे अनधिकृत बांधकामे हटवली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दुसऱ्या दिवशीही इचलकरंजीत अतिक्रमणांवर कारवाई; जेसीबीद्वारे अनधिकृत बांधकामे हटवली

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात सुरू असलेली मोहीम बुधवारी दुसऱ्या दिवशीही जोरात राबविण्यात आली. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेला सातत्य देत आज कोल्हापूर मुख्य रस्त्यावर प्रभाग समिती कार्यालय ते छत्रपती शाहू महाराज पुतळा या दरम्यान कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान मुख्य रस्त्यालगत गटारांवर करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे तसेच आरसीसी छावण्या जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर प्रभावीपणे कारवाई करण्यात आली.
आजच्या मोहिमेत उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये अग्निशमन, वाहन व आरोग्य विभागाचाही समावेश होता.
दरम्यान, महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी केलेली अतिक्रमणे संबंधितांनी स्वखर्चाने त्वरित काढून घ्यावीत, तसेच अनधिकृतरित्या रस्त्यावर व्यवसाय करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापौरांचे दातृत्व-
एका गरीब केळेवाला अतिक्रमण निर्मुलन मोहिमेवेळी महापौरांच्या निदर्शनास आला त्यावेळी त्यांनी त्याच्याकडे असलेली सर्व केळी विकत घेऊन गाडा त्यास परत केला,संवेदनशील महापौरांच्या दातृत्वाची चर्चा मोहिमेवेळी रंगली होती

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवेळी घेतलेले छायाचित्र
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा