हाळवणकरांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी
मुंबई, दि. २३ :
इचलकरंजीतील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दादर येथील वसंत स्मृती येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व नगरसेवक तानाजी पोवार यांनी केले.
या वेळी राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, सतीश पंडित, शहराध्यक्ष शशिकांत मोहिते, नगरसेवक मनोज हिंगमिरे, मनोज साळुंखे, मारुती पाथरवट, इम्रान बागवान व पोपट पुजारी उपस्थित होते.
हळवणकर यांनी इचलकरंजी मतदारसंघात पक्षवाढीसाठी केलेले कार्य व जनसंपर्क लक्षात घेता त्यांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर रवींद्र चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे समजते.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन देताना भाजपा पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






