वस्त्रोद्योगाचे सर्व प्रश्न आचारसंहितेपुर्वी सोडवणार-आ.प्रकाश आवाडे.
इचलकरंजी
वस्त्रोद्योगाशी निगडित सर्व प्रश्न आचारसंहितेपुर्वी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
यंत्रमागधारकांच्या वीजदर सवलती बाबत ऑनलाइन नोंदणीची अट रद्द करण्यात येणार असून सदर निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीत झाला असल्याने मंत्रिमंडळ बैठकीतच हा प्रश्न निकाली निघणार असल्याने त्याबाबत लवकरच उपाययोजना होईल,पोकळ थकबाकी तसेच सवलतीचा निर्णय हा ८ मार्चच्या बैठकीत झाला असून १५ मार्च रोजी परिपत्रक निघाले असल्याने लाभ हा १५ मार्चपासून मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरवातीला जागृती यंत्रमागधारक संघटनेचे विनय महाजन यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये सुरवातीला ३ लाख साधे यंत्रमाग होते तर ५ वर्षांपूर्वी १ लाखावर आले,आता सध्या ७० हजार साधे यंत्रमाग असून व्यवसाय संपू नये यासाठी लवकरात लवकर २३ कलमी पॅकेज आणले तसे पॅकेज आणा व व्यवसायास संजीवनी द्या असे सांगितले.
विश्वनाथ मेटे यांनी १३ वर्षांपासून मजुरीवाढ झाली नसल्याचे नमूद केले.
प्रकाश गौड यांनी ७५ पैशाने विषय संपणार नसून अजून काही मिळते का ते बघावे असे सांगितले,२४ ऑटो यंत्रमागाचे युनिट विजदरातील तफावतीमुळे नुकसानीत व्यवसाय करत असल्याचे नमूद केले.
राजगोंडा पाटील यांनी २७ अश्वशक्तीच्या वरील देशातील ३० हजार यंत्रमागापैकी १५ हजार यंत्रमाग फक्त इचलकरंजीत असून सवलत न मिळाल्यास ते दिपावली नंतर बंद पडतील अशी भीती व्यक्त केली.
बैठकीस डॉ.राहुल आवाडे,प्रकाश दत्तवाडे,चंद्रकांत पाटील,सुनील पाटील,रफिक खानापूरे,यांच्यासह यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बांग्लादेशच्या राजकीय अस्थिरतेचा इचलकरंजीला फायदा.-आ आवाडे
बांग्लादेश येथे राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याने त्याचा फायदा भारतीय वस्त्रोद्योगास होणार असून इचलकरंजीतील वस्त्रोद्योग भरभराटीला येईल.नविन ५००० एअरजेट लूमची ऑर्डर इचलकरंजीतुन गेली असून मंदी असेल तर ऑर्डर कशी जाते असेही मत आ.आवाडे यांनी व्यक्त केले.देशातील नामवंत कंपन्यांच्या ९० टक्के कापडाची ऑर्डर इचलकरंजीला असल्याचे ही त्यांनी सांगितले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







