इचलकरंजीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त “शिवशंभू छत्रपती जीवनचरित्र” लेखी परीक्षा स्पर्धा
इचलकरंजी :
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती सोहळा २०२६ निमित्त श्री शिवछत्रपती व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “शिवशंभू छत्रपती जीवनचरित्र” लेखी परीक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. ०९ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत व्यंकटराव हायस्कूल प्रांगण, इचलकरंजी येथे होणार आहे.
स्पर्धा दोन गटांत घेण्यात येणार असून लहान गटासाठी इयत्ता चौथी ते नववी, तर मोठ्या गटासाठी इयत्ता दहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देण्यात येणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी करताना शाळा किंवा कॉलेज आयडेंटी कार्ड अथवा निकालाच्या झेरॉक्सची प्रत आवश्यक राहणार आहे. नोंदणीसाठी श्री प्रसाद जाधव (मो. ८३९०३७३३००) समर्थ बेकरी, गांधी कॅम्प, इचलकरंजी तसेच श्री महेश जाधव (मो. ९०२२४४२६१६) समर्थ प्रेस, मंगळवार पेठ, इचलकरंजी येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“इतिहास वाचा, मिळे दिव्य दृष्टी” हा संदेश देत आपल्या छत्रपतींचा इतिहास जपण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समिती, इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





