खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचे आंदोलन सुरूच
तोडग्याची अद्याप अनिश्चितता
इचलकरंजी—-
मजुरी वाढीसाठी खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचे बंद आंदोलन सुरू असून शहराच्या विविध भागातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. तर अनेक यंत्रमागधारक कारखाने बंद करण्यासाठी विविध ठिकाणी जात असून बंदमध्ये सहभागी व्हा असे आवाहन करताना आढळून येत आहेत. तर हा संप मिटवण्यासाठी शासन पातळीवर कोणतीच हालचाल दिसून येत नाही.
गेल्या तेरा वर्षांपासून खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना ट्रेडिंग असोशियन कडून काहीच मजुरी वाढ मिळाली नसल्याने व सद्यस्थितीत कारखाने चालवणे अवघड झाल्याने यंत्रमागधारकांनी शनिवारपासून कारखाने बंद करण्याचे आवाहन केले होते. यानुसार चंदुर, गणेशनगर, कोरोची आदी भागातील कारखाने पूर्णपणे बंद झाले. तर काही ठिकाणी वादावादी झडली होती. कारखान्यातील बिमे कापण्याचाही प्रकार घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी चंदूर येथे यंत्रमागधारकांचा भव्य मेळावा पार पडला व अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.यानुसार आज सोमवारी जुना चंदुर रोड, तांबे माळ,
गावभाग इत्यादी ठिकाणी मोटरसायकल रॅली काढून कारखानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तर यंत्रमागधारक संघटना, पॉवरलूम असोशियन, ट्रेडिंग असोशियन, आमदार राहुल आवाडे यांच्याकडून बैठकीबाबत अनिश्चितता दिसून येत असल्याने कारखानदार हवालदील झाला आहे. जर येत्या दोन-तीन दिवसात त्या संदर्भात बैठक आयोजित केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकाकडून देण्यात येत आहे.
लाल बावटा कामगार संघटनांचा पाठिंबा
खर्चीवाले यंत्रमाग धारकांच्या आंदोलनाला लालबावटा जनरल कामगार युनियनने पाठिंबा दिला असून हा घटक गेली अनेक वर्ष मजुरीवाढी पासून वंचित राहिला आहे. त्यांना मजुरी वाढवून मिळावी यासाठी तातडीने बैठक बोलवावी अशा मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी यांना आज देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की यंत्रमाग कामगारांनाही दहा वर्षे मजुरी वाढ मिळाली नाही या आंदोलनातून कारखानदारासह, कामगारांचाही प्रश्न सोडवावा अन्यथा यंत्रमाग कामगार रस्त्यावर उतरतील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. कॉम्रेड भरमा कांबळे, अंबादास
कुणीगिरी, बंडा पाटील, शोभा शिंदे, सुभाष कांबळे, विष्णू दंडवते, नामदेव शिंदे यांच्यासह आहेत.
हवालदिल यंत्रमंगधारक,बंद कारखाने
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








