ICHMH51NEWS.IN
9921600800

पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त पल्लवी पाटील यांची एसटीपी प्रकल्पाला भेट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त पल्लवी पाटील यांची एसटीपी प्रकल्पाला भेट

इचलकरंजी:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत टाकवडे वेस येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) ची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची कार्यपद्धती, सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया, यंत्रणा आणि पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवून जलप्रदूषण नियंत्रण आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा