शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
इचलकरंजी:
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवतीर्थ येथील अश्वारूढ पुतळा, छत्रपती शिवाजी उद्यानातील अर्धपुतळा तसेच कॉ. के. एल. मलाबादे चौकातील राज्याभिषेक सोहळा डिजिटल फलकास अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
म
छ.शिवाजी महाराजाना भिवादन करताना पदाधिकारी
छ.शिवाजी महाराजाना भिवादन करताना पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






