ICHMH51NEWS.IN
9921600800

महेश पाटील यांच्या जात वैधता प्रकरणाची सुनावणी पूर्ण; समितीचा निर्णय प्रतीक्षेत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महेश पाटील यांच्या जात वैधता प्रकरणाची सुनावणी पूर्ण; समितीचा निर्णय प्रतीक्षेत

पट्टणकोडोली :

पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले सदस्य महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांच्या जात वैधता प्रकरणातील अंतिम सुनावणी जिल्हा जात पडताळणी समिती, कोल्हापूर यांच्यासमोर ३ जून २०२६ रोजी पार पडली. तब्बल पाच तास चाललेल्या या सुनावणीनंतर समितीने आपला निकाल राखून ठेवला असून आता सर्वांचे लक्ष समितीच्या निर्णयाकडे लागले आहे.
या प्रकरणी तक्रारदार तुषार जितेंद्र बाणदार यांनी महेश पाटील यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेत जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज दाखल केला होता. अंतिम सुनावणी सायंकाळी ५ वाजता सुरू झाली आणि रात्री १० वाजेपर्यंत चालली.
तक्रारदार तुषार बाणदार यांच्या वतीने ॲड. भीमसेन राजमाने, ॲड. सुनील कांबळे, ॲड. संदेश कांबळे, ॲड. शरद शिंगे, ॲड. किरण कांबळे, ॲड. राहुलराज कांबळे, ॲड. महेश कांबळे, ॲड. प्रवीण कांबळे तसेच प्रमोद दाभाडे यांनी बाजू मांडली. सुनावणीस जिल्ह्यातील शंभरहून अधिक नागरिक उपस्थित होते.
समितीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याची प्रत तक्रारदार तुषार बाणदार यांना टपालाद्वारे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुनावणीदरम्यान देण्यात आली.

आरक्षणाच्या संरक्षणासाठी महत्त्वाची सुनावणी
तक्रारदार तुषार बाणदार यांच्या मते, ही सुनावणी संविधानाने अनुसूचित जातींसाठी दिलेल्या आरक्षणाच्या तरतुदींचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव जागांचा गैरवापर रोखण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये काटेकोर पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समितीचा निर्णय हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून आरक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेशी संबंधित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा