आपटे वाचन मंदिर येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिर येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी (ता.१२)–येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराच्यावतीने डॉ. एस्. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन ग्रंथपाल दिन म्हणून उत्साहात पार पडला.
प्रारंभी महानगरपालिकेचे रवींद्रनाथ टागोर ग्रंथालय येथील ग्रंथपाल बेबी नदाफ यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले. यानंतर प्रास्ताविक व डॉ. रंगनाथन यांच्या विषयी कार्यवाह कु. माया कुलकर्णी यांनी माहिती दिली. गणिताचे उत्तम विदयार्थीप्रिय प्राध्यापक असूनही पुस्तकांच्या आवडीमुळे मद्रास येथील विद्यापीठात ग्रंथपाल पद स्विकारून एकूणच ग्रंथांची मांडणी, वर्गीकरण व देवाणघेवाण यासंबंधी आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. तसेच ग्रंथपाल हा पुस्तकांचानुसता रखवादलदार नसून वाचक व पुस्तके यांच्यामधला दुवा आहे. ग्रंथालय हा अध्यापनाचा विषय होवू शकतो असे
डॉ. रंगनाथन यांनी आवर्जून सांगितले आहे. यानंतर संचालक श्री. काशिनाथ जगदाळे यांनी पुस्तकांचे महत्त्व सांगणारी उदाहरणे दिली. महानगरपालिकेचे रवींद्रनाथ टागोर ग्रंथालयाचे लिपिक श्री. राहूल राजापूरे यांनीही पुस्तकांचे महत्त्व सांगितले तसेच एक गझल सादर केली. सहकार्यवाह डॉ. कुबेर मगदूम यांनी लहानमुलांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे कसे आवश्यक आहे. याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर संचालक श्री. अशोक केसरकर यांनीही पुस्तकांचे ग्रंथपाल आनंदा काजवे, साए ग्रंथपाल सुनिता सामंत
महत्त्व सांगून आभार मानले. ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने आपटे वाचन मंदिराचे सर्व कर्मचारी तसेच रवींद्रनाथ टागोर ग्रंथालयाच्या ग्रंथपाल व लिपिक यासर्वांना सर्व संचालकांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
याप्रसंगी संचालक प्रा. मोहन पुजारी, सौ. मीनाक्षी तंगडी वश्री. सुकुमार खंजिरे, श्री. बबन पांढरपट्टे, प्रा. आर्या कुलकर्णी, श्री. अशोक कुरुंदवाडे तसेच इतर वाचकवर्ग उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More