रक्षाबंधन निमित्त इचलकरंजी आगारातून जादा गाड्यांचे नियोजन.
इचलकरंजी
सोमवार, दि. १९ ऑगस्ट रक्षाबंधन (नारळीपौर्णिमा) असल्याने बसस्थानकारवर होणारी संभाव्य गर्दी विचारात घेवून प्रवाशांच्या सोयीसाठी शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकावरुन सोमवार दि. १९ ऑगस्ट रक्षाबंधन दिवशी इचलकरंजी नृसिंहवाडी, कोल्हापूर, वडगांव वठार, मिरज सांगली, निपाणी, सोलापूर व पुणे या प्रमुख मार्गावर जादा वाहतूकीचे नियोजन करण्यात आलेले असून इचलकरंजी आगारमार्फत बसेस उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
तरी इचलकरंजी शहर, हातकणंगले तालुका व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक, इचलकरंजी यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800