ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत BSNL ची अंडरग्राउंड केबल चोरीचा प्रयत्न; आंध्रप्रदेशातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत BSNL ची अंडरग्राउंड केबल चोरीचा प्रयत्न; आंध्र प्रदेशातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी :
 इचलकरंजी शहरातील बीएसएनएल कार्यालय ते एस.टी. स्टॅण्ड परिसरात शासनाच्या मालकीची अंडरग्राउंड दूरसंचार केबल चोरण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २१ जून) पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बीएसएनएल कार्यालय परिसरात काही जण शासनाच्या मालकीची अंडरग्राउंड केबल चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित केबल ही हिंदुस्थान केबल लिमिटेड, हैदराबाद यांनी १९९५ मध्ये तयार केलेली 2000PRS/040 MM जेली प्रकारातील असून ती दूरसंचार सेवेसाठी वापरली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बीएसएनएल कार्यालय, इचलकरंजी येथील ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर संतोषकुमार पांडुरंग पवार यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व आरोपी हे आंध्रप्रदेशातील विविध भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा