ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या ८ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल्समध्ये निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या ८ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल्समध्ये निवड

इचलकरंजी: डीकेटीई टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या बी.टेक. टेक्स्टाईल्स विभागातील ८ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य व प्रतिष्ठित वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड कंपनीमध्ये कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड झाली आहे.
लुधियाना (पंजाब) आणि भोपाळ येथील प्रकल्पांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सानिका नाईक, पारस मालमे, शंतनु देसाई, वेदांत पाटील, अनिश पाटील, सुमिरण पांडे, विरेंद्र पाटील आणि शुभम कोष्टी यांचा समावेश आहे.
वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड ही वस्त्रोद्योग क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी असून यार्न, प्रोसेस्ड फॅब्रिक्स, शिवण धागे आणि अ‍ॅक्रिलिक फायबर निर्मितीत कंपनीचे विशेष योगदान आहे. देश-विदेशात कंपनीची उत्पादने लोकप्रिय असून विविध राज्यांमध्ये तिचे विस्तृत कार्यक्षेत्र आहे.
डीकेटीई संस्थेकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उद्योगाभिमुख प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि उद्योग क्षेत्राशी सातत्यपूर्ण संवाद यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना तृतीय वर्षातच समर इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाते. उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे प्री-प्लेसमेंट ऑफर मिळण्याची संधीही विद्यार्थ्यांना दिली जाते.
संस्थेच्या इंडस्ट्री–इन्स्टिट्यूट इंटरअ‍ॅक्शन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मुलाखतीत आपली गुणवत्ता सिद्ध करता येत असून त्यामुळे डीकेटीईचे विद्यार्थी प्लेसमेंटमध्ये सातत्याने यश संपादन करत आहेत, असे मत संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे यांनी व्यक्त केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील आणि टीपीओ प्रा. एस. बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल्समध्ये निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमवेत रवी आवाडे, डॉ. एल. एस. आडमुठे, डॉ. यु. जे. पाटील व एस. बी. अकिवाटे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा