ICHMH51NEWS.IN
9921600800

मूळ फाईल उपलब्ध नसल्याने ठेवीची रक्कम अडकली; जिल्हा सहआयुक्तांकडे कंत्राटदाराची धाव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मूळ फाईल उपलब्ध नसल्याने ठेवीची रक्कम अडकली; जिल्हा सहआयुक्तांकडे कंत्राटदाराची धाव

इचलकरंजी :

तत्कालीन इचलकरंजी नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या विकासकामांच्या मूळ फाईल उपलब्ध नसल्याने सुरक्षा ठेवीची (डिपॉझिट) रक्कम अडकून पडल्याचा दावा करत कंत्राटदार दीपक शिंगाडे यांनी जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन विभाग, कोल्हापूर यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधितांना सूचना देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषद हद्दवाढ योजना व रस्ता अनुदान योजनेअंतर्गत त्यांनी काही विकासकामे घेतली होती. संबंधित कामे पूर्ण होऊन अंतिम बिलेही प्राप्त झाली आहेत. मात्र कामांच्या अनुषंगाने ठेव रक्कम मिळण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप रक्कम मिळालेली नाही.

महानगरपालिकेकडून संबंधित कामांच्या मूळ फाईल उपलब्ध नसल्याने डिपॉझिट रक्कम अदा करण्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा अर्जदाराने केला आहे.

या कामांशी संबंधित तत्कालीन स्थापत्य अभियंता श्रीमती राधिका हावळ या सध्या जयसिंगपूर नगरपरिषदेत कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात संबंधित फाईल उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार विनंती करूनही त्याची पूर्तता झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नगरपालिका प्रशासन विभागाच्या अखत्यारीत संबंधित संवर्ग कर्मचारी येत असल्याने श्रीमती हावळ तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला मूळ फाईल उपलब्ध करून देण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त यांनाही देण्यात आली आहे.

अर्जदाराची परिस्थिती बिकट

अर्जदार दीपक शिंगाडे यांना पॅरेलेसिस झालेला असून अशा परिस्थितीत त्यांना वारंवार चकरा मारायला लावल्याने उद्या काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी मनपा प्रशासन घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा