ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; मेफेन्टर्मिन सल्फेट इंजेक्शनसह तरुण अटकेत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; मेफेन्टर्मिन सल्फेट इंजेक्शनसह तरुण अटकेत

इचलकरंजी :

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मेफेन्टर्मिन सल्फेट (MEPHENTERMINE SULPHATE) इंजेक्शनच्या ५१ बाटल्या जप्त करून निखिल शंकर पाटील वय २३ रा.कबनूर या तरुणाला अटक केली. या कारवाईत मोबाईल हॅण्डसेटसह एकूण ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम गजबरसाब सनदी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कबनूर (ता. हातकणंगले) येथील यशवंत कॉलनी ते पाटील मळा रस्त्यावर संशयित व्यक्ती नशिले इंजेक्शन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून निखील शंकर पाटील (वय २३, रा. कबनूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता १० मिलीच्या ५१ सिलबंद बाटल्या आढळून आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत ३०४ रुपये असून इंजेक्शनची एकूण किंमत १५ हजार ५०४ रुपये आहे. तसेच १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.सदर इंजेक्शन बाळगण्याचा परवाना किंवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आरोपीकडे नसल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण व गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा