ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे गांधी पुतळा येथे आंदोलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे गांधी पुतळा येथे आंदोलन

इचलकरंजी :
अयोध्येतील श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणातील प्रमुख आरोपी चंपतराय व अनिल मिश्रा यांना तातडीने अटक करून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने गांधी पुतळा येथे निदर्शने करण्यात आली.यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हनुमान मंदिरात श्री हनुमानाचे पूजन करून प्रार्थना केली.
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे नेते नगरसेवक मदन कारंडे व शशांक बावचकर यांनी अयोध्येतील कथित दानपेटी लुटीच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणामुळे देशातील १४० कोटी जनतेच्या श्रद्धेचा व विश्वासाचा घात झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, धार्मिक भावना आणि जनतेच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नसून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात शशांक बावचकर, नगरसेवक संजय कांबळे, उदयसिंग पाटील, अमरजीत जाधव,यांच्यासह राजू लोखंडे, सदा मलाबादे, प्रमोद खुडे, रतन वाझे, अखिल खानापुरे, वसंत कोरवी, संतोष पाटील, अल्ताफ मुजावर, अभिजित रवंदे, विशाल धुमाळ, राजू किनेकर, सचिन रानभरे, सॅम आठवले, नोविंद आढाव, प्रविण पाटील, प्रवीण फगरे, सुनिल मुधाळकर, मलकारी लवटे, तौशिक लाटकर, युवराज शिंगाडे, गोपी कांबळे, दावा पाटील, किरण भागवत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलन करताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा