साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना इचलकरंजी महानगरपालिकेकडून अभिवादन
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त किसनराव आवळे मैदान येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते, तर स्थायी समिती सभापती सतीश मुळीक आणि समाजकल्याण सभापती रुबन आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नगरसेविका मनीषा नवनाळे, नगरसेवक अविनाश कांबळे, मारुती पाथरवट, प्रशांत नवनाळे, तसेच अधीक्षक संदीप जोशी, गणेश शिंदे, संजय कांबळे, प्रदीप मळगे, सचिन शेडबाळे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







