जैन साधू आचार्य वर्धमान सागर महाराज यांची विनयांजली सभा सोमवारी इचलरकंजीत
इचलकरंजी :
नुकतेच सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे इचलकरंजी गौरव प.पु. १०८ आचार्य वर्धमान सागर महाराज यांची सल्लेखनापूर्वक समाधी झाली. त्यांना विनयांजली अर्पन करणेसाठी इचलकरंजी व पंचक्रोषीतील जैन श्रावक व श्रावीकांची विनयांजली सभा सोमवार दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वा. पंचरत्न सांस्कृतीक कार्यालय, पंचगंगा साखर कारखान्या शेजारी, इचलकरंजी येथे आयोजीत करणेत आली आहे.
या विनयांजली सभेसाठी परंपूज्य आचार्य १०८ विद्यासागरजी महाराज सहसंघ उपस्थित राहून विनयांजली अर्पण करणार आहेत. तसेच श्रावक व श्रावीकांना आशिर्वाद देणार आहेत. त्याचबरोबर प.पू. १०८ सुयश सागरजी महाराज सहसंघ उपस्थित राहून विनयांजली अर्पन करणार आहेत. तरी या विनयांजली सभेस सर्व श्रावक व श्रावीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच या विनयांजली सभेला उपस्थित रहाणेसाठी प.पू. १०८ विद्यासागरजी महाराज, आचार्य पदारूढ झालेनंतर प्रथमच इचलकरंजीमध्ये रविवार दि. १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शहापूर रोड, गैबान पेट्रोल पंपाजवळ प्रवेश करणार आहेत. त्यांचे इचलकरंजी नगरिमध्ये स्वागत करणेसाठी श्रावक व श्रावीकांनी उपस्थित राहवे असे आवाहन करणेत आले आहे.
सदर विनयांजली सभेस आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहून श्रद्धासुमन अर्पण करणार आहेत. याप्रसंगी आचार्य विद्यासागरजी महाराज व आचार्य सुयश सागरजी महाराज यांचे आशिर्वचन होणार आहे. त्यामुळे सोमवार दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजलेपासून श्रावक व श्रावीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विनयांजली सभा आयोजक कमिटीने केले आहे.
आचार्य वर्धमानसागरजी महाराज
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







