ICHMH51NEWS.IN
9921600800

NEET 2026 मध्ये श्री. ए. आर. तांबे सरांच्या ‘श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’चा अभूतपूर्व विक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

NEET 2026 मध्ये श्री. ए. आर. तांबे सरांच्या ‘श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’चा अभूतपूर्व विक्रम

इचलकरंजी
पश्चिम महाराष्ट्रात एका शाखेतून सर्वाधिक यश 107 विद्यार्थ्यांना 500 पेक्षा अधिक गुण, 19 विद्यार्थ्यांनी पार केला 600 गुणांचा टप्पा
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचा नवा इतिहास रचत श्री. ए. आर. तांबे सर यांच्या श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने NEET-2026 परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. यंदाच्या निकालात एका शाखेतून तब्बल 107 विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा अधिक गुण मिळवत पश्चिम महाराष्ट्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याशिवाय 67 विद्यार्थ्यांनी 550 पेक्षा अधिक गुण, तर 19 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवून संस्थेच्या यशाचा सुवर्णअध्याय लिहिला आहे. या वर्षीच्या निकालात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुहान शेख (690), अथर्व गडदे (657), स्वयम बकाले (653), पूर्वा तेलसिंगे (646), निलभकदम (641), मिसबा म्हाबरी (638), श्रुती घाटगे (637), आर्यन सादळे (635), मधुरा मोरे (630), पूनम नेमाणे (627), संचिता बेडगे (622), प्राची चौगुले (620), पल्लवी तामखेडे (616), रिया भुजुगडे (616), शाल्मली नरवाडे (609), अथर्व गुमठाण्णावर (609), वीरेंद्र आवटी (605), कृष्णकांत अटकेकर (604) आणि सिद्धेश लंबोरे (603) या विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
NEET-2026 परीक्षा रद्द होऊन पुन्हा परीक्षा होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील लाखो विद्यार्थी मानसिक तणाव, अनिश्चितता आणि नैराश्याच्या छायेत गेले होते. अशा कठीण काळात श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. संस्थेने तातडीने विशेष टेस्ट सिरीज, दररोजच्या डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स, वैयक्तिक मार्गदर्शन, नियमित प्रॅक्टिस टेस्ट, प्रेरणादायी समुपदेशन आणि अभ्यासाचे सातत्य कायम ठेवणारे नियोजन राबवले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित झाला नाही आणि परीक्षेबाबत निर्माण झालेली भीती, नैराश्य व मानसिक तणाव दूर करण्यास मोठी मदत झाली. याच सातत्यपूर्ण आणि वैज्ञानिक तयारीमुळे विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेत आत्मविश्वासाने यश संपादन करत पश्चिम महाराष्ट्रात नवीन विक्रम प्रस्थापित केला.
या यशामागे आणखी एक प्रेरणादायी बाब म्हणजे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी मध्यमवर्गीय, शेतकरी आणि कामगार कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींवर मात करत या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि श्रद्धा परिवाराच्या सक्षम मार्गदर्शनाच्या बळावर वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. या यशामुळे अनेक पालकांनी श्रद्धा इन्स्टिट्यूटने परीक्षा रद्द झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होऊ दिला नाही, त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन दिले, याबद्दल संस्थेबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या अभूतपूर्व यशामध्ये संस्थेच्या समर्पित समन्वयकांचेही मोलाचे योगदान लाभले. श्री. एम. एस. पाटील सर, सौ. सुप्रिया कौंदाडे, सौ. संगीता पवार, श्री. अभिषेक तांबे, सौ. सृष्टी तांबे, श्री. राहुल खोत, श्री. बिप्लब पॉल, श्री. सत्यनारायणन आणि श्री. नागेंद्र यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणा आणि वैयक्तिक शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून दिले. श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच संपूर्ण अध्यापन व समन्वयक टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्याचबरोबर प्रतिवर्षीप्रमाणे श्रद्धाच्या विद्यार्थ्यांना एम्स, गव्हर्मेंट व सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश मिळतील असा विश्वास यावेळी तांबे सरांनी व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, “यश ही केवळ गुणांची संख्या नसून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाचा विजय आहे. परीक्षा रद्द झाल्यानंतरही आमच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊ नये, त्यांची तयारी खंडित होऊ नये आणि प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सक्षम राहावा, यासाठी श्रद्धा परिवाराने दिवस-रात्र परिश्रम घेतले. आजचे हे यश त्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. भविष्यातही देशाला उत्कृष्ट डॉक्टर घडविण्याचे आमचे ध्येय अधिक जोमाने सुरू राहील.”
NEET-2026 मधील या विक्रमी यशामुळे श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने पुन्हा एकदा गुणवत्ता, विश्वास, शिस्तबद्ध नियोजन आणि सातत्यपूर्ण निकालांची परंपरा सिद्ध करत पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन क्षेत्रातील अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा