ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रद्धा इन्स्टिट्यूटचा गुणवंतांचा भव्य गौरव सोहळा; २९ विद्यार्थी IIT, २९ NIT, ९ IIIT तर ८० विद्यार्थ्यांना ९९+ पर्सेन्टाइल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रद्धा इन्स्टिट्यूटचा गुणवंतांचा भव्य गौरव सोहळा; २९ विद्यार्थी IIT, २९ NIT, ९ IIIT तर ८० विद्यार्थ्यांना ९९+ पर्सेन्टाइल

इचलकरंजी : पश्चिम महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटच्या वतीने आयोजित “गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा – २०२६” उत्साहात पार पडला. IIT-JEE Advanced, JEE Mains आणि MHT-CET २०२६ परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या सोहळ्याचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. लक्ष्मण केरीपाळे प्रमुख उपस्थित होते.

यंदा श्रद्धा इन्स्टिट्यूटने पुन्हा एकदा उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखत २९ विद्यार्थ्यांना IIT२९ विद्यार्थ्यांना NIT९ विद्यार्थ्यांना IIIT मध्ये प्रवेश मिळवून दिला. तसेच ८० विद्यार्थ्यांनी JEE Mains परीक्षेत ९९ पेक्षा अधिक पर्सेन्टाइल मिळवत संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. माणिकराव साळुंखे म्हणाले की, “श्रद्धा इन्स्टिट्यूट केवळ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करत नाही, तर त्यांच्यामध्ये संस्कार, मानवी मूल्ये आणि उत्तम चारित्र्याचीही जडणघडण करते. ज्ञान, कठोर परिश्रम आणि चारित्र्य या त्रिसूत्रीवरच यशस्वी आयुष्य उभे राहते.”

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स आणि मशीन लर्निंगच्या युगात विद्यार्थ्यांनी संशोधनाची कास धरून देशाच्या विकासात योगदान द्यावे, तसेच पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा लाभ घेत जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवावे, असेही त्यांनी सांगितले.

सोहळ्यातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे २९ IIT, २९ NIT, ९ IIIT आणि ९९+ पर्सेन्टाइल मिळवलेल्या ८० विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मंचावर सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा बांधून गौरवपत्र देण्यात आले. मुलांच्या यशाचा सन्मान होताना अनेक पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

यावेळी श्रद्धा इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ए. आर. तांबे, समन्वयक सुप्रिया कौंदाडेसंगीता पवारअभिषेक तांबे आणि सृष्टी तांबे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पालकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संस्थेच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला.

यश, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचा संगम असलेल्या या सोहळ्याने विद्यार्थी आणि पालकांसाठी अविस्मरणीय आठवण निर्माण केली. श्रद्धा इन्स्टिट्यूटने पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील आपले अग्रस्थान अधोरेखित केले.

गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याप्रसंगी घेतलेले छायाचित्र

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा