ICHMH51NEWS.IN
9921600800

फॅन्सी नंबर प्लेटविरोधात वाहतूक शाखेची ५४ वाहनांवर कारवाई,३३ नंबर प्लेट जप्त करत २९ हजाराचा दंड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

फॅन्सी नंबर प्लेटविरोधात वाहतूक शाखेची ५४ वाहनांवर कारवाई,३३ नंबर प्लेट जप्त करत २९ हजाराचा दंड

इचलकरंजी :

वाहनांवर नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट, आकर्षक अक्षरे-आकडे, विविध चिन्हे तसेच नोंदणी क्रमांकामध्ये फेरफार करणाऱ्या वाहनचालकांविरोधात इचलकरंजी शहर वाहतूक शाखेने विशेष कारवाईची मोहीम राबविली. दि. १९ ते २० ऑगस्टदरम्यान झालेल्या या कारवाईत ५४ वाहनांवर कारवाई करून एकूण २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ३३ फॅन्सी नंबर प्लेट जमा करण्यात आल्या.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर वाहतूक शाखेचे सपोनि विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

दरम्यान, फॅन्सी व नियमबाह्य नंबर प्लेट तयार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी नंबर प्लेट तयार करणाऱ्या विक्रेते व व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. शासनाने निर्धारित केलेल्या नमुन्याव्यतिरिक्त फॅन्सी अथवा नियमबाह्य नंबर प्लेट तयार करू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नोंदणी क्रमांकामध्ये फेरफार करणे अथवा अनधिकृत मजकूर व चिन्हे लावून देणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला.

वाहनचालकांनी आपल्या वाहनावरील फॅन्सी नंबर प्लेट तात्काळ काढून शासनमान्य, स्पष्ट व वाचनीय नंबर प्लेट बसवावी. नंबर प्लेटवर नाव, पद, धार्मिक किंवा अन्य अनधिकृत चिन्हे अथवा मजकूर लिहू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सपोनि विकास शिंदे यांनी केले आहे.

अल्पवयीन मुलांना वाहने देऊ नका-

गेल्या महिन्यात ७ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून एका वाहनांची आरसी रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे कोणीही अल्पवयीन मुलांना वाहने देऊ नये असे आवाहनही सपोनि विकास शिंदे यांनी केले आहे.

जप्त केलेल्या फॅन्सी नंबरप्लेटसह स.पो.नि विकास शिंदे व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा