ICHMH51NEWS.IN
9921600800

नदीवेस–चावरे गल्ली परिसरात काळेकुट्ट पाणीपुरवठा; नागरिकांमध्ये संताप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नदीवेस–चावरे गल्ली परिसरात काळेकुट्ट पाणीपुरवठा; नागरिकांमध्ये संताप

इचलकरंजी : नदीवेस–चावरे गल्ली परिसरात महानगरपालिकेकडून नागरिकांना करण्यात आलेला पाणीपुरवठा काळेकुट्ट व दूषित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेबाबत प्रशासनाचा निष्काळजीपणा गंभीर असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, महानगरपालिकेने तातडीने या पाणीपुरवठ्याची तपासणी करावी, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि दूषित पाणीपुरवठ्याचे नेमके कारण शोधावे, अशी मागणी मनसेने केली आहे.
संबंधित परिसरातील नागरिकांना तातडीने स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच भविष्यात अशा प्रकारचा दूषित पाणीपुरवठा होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शारीरिक सेना जिल्हाध्यक्ष सूरज बेलेकर यांनी दिला आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा