ICHMH51NEWS.IN
9921600800

स्थायी समिती सभेत रेनकोट,शैक्षणिक साहित्य व पर्यावरणपूरक वाहन खरेदीस मंजुरी-सतीश मुळीक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्थायी समिती सभेत रेनकोट,शैक्षणिक साहित्य व पर्यावरणपूरक वाहन खरेदीस मंजुरी-सतीश मुळीक

इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत महानगरपालिकेच्या शाळा व प्रशासकीय कामांशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

महानगरपालिका प्राथमिक शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता शालेय साहित्य खरेदीसाठी १ कोटी १ लाख ७३ हजार २११ रुपये अंदाजपत्रकीय खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदी करण्यासाठी ३८ लाख ४३ हजार ३७२ रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी चार नवीन इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास तसेच संबंधित कामांसाठी ५८ लाख ७५ हजार ५६४ रुपये अंदाजे खर्चास मंजुरी देण्यात आली. पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांची सुरक्षितता आणि महानगरपालिकेचे कामकाज आधुनिक व पर्यावरणपूरक करणे याला प्राधान्य असल्याचे सभापती सतीश मुळीक यांनी सांगितले. या विषयांना मंजुरी मिळण्यासाठी सहकार्य करणाऱ्या स्थायी समिती सदस्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा