ICHMH51NEWS.IN
9921600800

गणेशोत्सवातील मिरवणुकीच्या एकाच दिवसाच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणेशोत्सवातील मिरवणुकीच्या एकाच दिवसाच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध

इचलकरंजी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका एकाच दिवशी काढण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विरोध दर्शविला आहे. मंडळांना त्यांच्या परवानगी व नियोजनानुसार वेगवेगळ्या दिवशी मिरवणुका काढण्याची मुभा द्यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केली.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत चौगुले यांनी सांगितले की, अनेक गणेश मंडळांनी आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी आधीच नियोजन करून विविध व्यवस्था आणि बुकिंग केले आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे ऐनवेळी नियोजन बदलण्याची वेळ आल्यास मंडळांसमोर अडचणी निर्माण होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात गोंधळ होण्याची शक्यता आहे.
एकाच दिवशी मोठ्या संख्येने मिरवणुका निघाल्यास वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, स्वयंसेवकांची उपलब्धता आणि इतर व्यवस्थापनावरही अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्व मंडळांना एकाच दिवशी मिरवणूक काढण्याची सक्ती करण्याऐवजी पोलीस प्रशासनाने मंडळनिहाय नियोजन करून अर्ज व परवानगीनुसार स्वतंत्र दिवस निश्चित करावेत, अशी भूमिका शिवसेनेने मांडली.
या मागणीसाठी अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार असल्याचेही चौगुले यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, नगरसेवक सयाजी चव्हाण, माजी शहरप्रमुख धनाजी मोरे, युवासेनेचे अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, संतोष लवटे, देवराज खोत, शुभम चौगुले यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख संजय चौगुले,मलकारी लवटे, नगरसेवक शिवाजी पाटील
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा