डॉ. प्रभाकर कोरे को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या इचलकरंजी शाखेचा शुभारंभ
इचलकरंजी :
डॉ. प्रभाकर कोरे को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., अंकली (मल्टी स्टेट)च्या इचलकरंजी शाखेचा शुभारंभ आज गांधी पुतळा,गणपती मंदिरासमोर, मेन रोड येथे उत्साहात करण्यात आला. सकाळी ११ वाजता लक्ष्मीपूजन करून शाखेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
यावेळी डी. जी. कोरे (आण्णा), किशोर भुसारी, अभिनव कोरे, एस. टी. खोत, विजय पाटील (दत्तवाड), राम आडकी, केतन भुसारी, विजय पाटील, राजकुमार देगावकर, शिवकुमार मुरतले, शरद कोकळकी ग्रुप, चंद्रकांत मिठारी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे हेड ऑफिसचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, इचलकरंजी शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील नागरिक, व्यापारी व उद्योजकांना आर्थिक सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शाखेची सुरुवात करण्यात आली आहे. शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शुभारंभ करताना डी.जी.कोरे आण्णा व मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







