ICHMH51NEWS.IN
9921600800

उत्साहासह कायदा-सुव्यवस्थेचे भान ठेवा : रंजनकुमार शर्मा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उत्साहासह कायदा-सुव्यवस्थेचे भान ठेवा : रंजनकुमार शर्मा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच कायदा व सुव्यवस्थेचे भान राखावे. गणेशमूर्तींच्या सुरक्षिततेसाठी मंडळांनी स्वयंसेवक नियुक्त करावेत. समाजकंटकांना संधी मिळणार नाही, याची दक्षता घेत पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मिरवणूक मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे लोकप्रतिनिधी, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि पोलीस प्रशासनाची समन्वय बैठक झाली. यावेळी गणेशोत्सव शांततेत, उत्साहपूर्ण वातावरणात व नियमांचे पालन करून साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

पोलीस अधीक्षक निलोप्पल यांनी गणेश मंडळांवर निर्बंध घालून त्यांचा उत्साह कमी करणे हा पोलिसांचा उद्देश नसल्याचे स्पष्ट केले. मात्र न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे आवश्यक असल्याने मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही बसवावा तसेच मंडप उभारताना रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

आगमन मिरवणुकीसाठी पारंपरिक मंडळांनाच परवानगी दिली जाईल. ध्वनीच्या मर्यादेचे पालन करण्याच्या अटीवर दोन बेस व दोन टॉप लावण्यास परवानगी असेल. मात्र लेझर, प्रेशर पॅड, कार्बन व फॉगिंगच्या वापरास परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजीच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपतानाच ध्वनी व पर्यावरण प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले. पोलीस प्रशासनाने मंडळांना सहकार्य करावे आणि मंडळांनीही प्रशासनावर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी दरवर्षीप्रमाणे आगमन मिरवणुकीला परवानगी देण्याची मागणी केली. उपमहापौर अनिल डाळ्या यांनी गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून ५२ कुंडांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा