ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लब पुरस्कृत विविध इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लब पुरस्कृत विविध इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

इचलकरंजी :

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी पुरस्कृत विविध शाळांमधील इंटरॅक्ट क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रोटरी श्रीमती सौ. रामविलास बाहेती सेवा केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमास रोटरी प्रांत ३१७०च्या असिस्टंट गव्हर्नर सौ. यास्मिन मणेर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी उपस्थितांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. कमिटी चेअरमन उत्तम रुग्गे यांनी प्रास्ताविक केले, तर अजित कुरडे यांनी ‘फोर वे टेस्ट’चे वाचन केले. त्यानंतर सन २०२६-२७ साठी विविध इंटरॅक्ट क्लबच्या नूतन अध्यक्ष व सचिवांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदभार देण्यात आला.

आंतरभारती विद्यालयाचे तेजस पाटील व श्रेयस कोळी, मारवल इंग्लिश स्कूलच्या सदफ कुरणे व सोनाक्षी केशरवाणी, इंदुमती आवाडे मयूर गर्ल्स स्कूलच्या आदिती पाटील व श्रेया निर्मळे, शांतिनाथ एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन करडे व ओम संगलगे यांच्यासह विविध शाळांतील नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. सर्व सहभागी इंटरॅक्ट शाळांना शैक्षणिक साहित्याचेही वितरण करण्यात आले.

प्रमुख पाहुण्या सौ. मणेर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण, समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, आई-वडील व वृद्धांची काळजी आणि स्वतःचा विकास या महत्त्वाच्या बाबींचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी तेजस पाटील, सदफ कुरणे तसेच शिक्षक एस. एस. पाटील व सौ. एम. जे. जावीर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सत्यनारायण धूत, मुकुंद माळी, डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांच्यासह इंटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालनानंतर सेक्रेटरी सुनील यळरूटे यांनी आभार मानले.

पद्ग्रहण सोहळ्यावेळी उपस्थित पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा