ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईत नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; ज्ञान, कौशल्य व नवोपक्रमांचा रवी आवाडे यांचा प्रेरणादायी कानमंत्र

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईत नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; ज्ञान, कौशल्य व नवोपक्रमांचा रवी आवाडे यांचा प्रेरणादायी कानमंत्र

इचलकरंजी, ता. ३ : अभियांत्रिकी शिक्षणासोबतच कौशल्य, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख ज्ञान आत्मसात करून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगासाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी केले.

डीकेटीईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक, टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग, डिप्लोमा, एमबीए व एमसीए अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत व परिचय कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे होत्या.

रवी आवाडे म्हणाले, केवळ पदवी मिळविण्यावर न थांबता विद्यार्थ्यांनी सातत्याने नवीन ज्ञान आत्मसात करावे. संस्थेतील आयडिया लॅब, फॅब लॅब, आधुनिक तांत्रिक सुविधा, संशोधनाच्या संधी, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि उद्योगांशी असलेल्या सहकार्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. ज्ञानाचा उपयोग समाज व देशहितासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.

संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांनी शैक्षणिक गुणवत्ता, उद्योगाभिमुख शिक्षण, प्लेसमेंट व आंतरराष्ट्रीय संधींची माहिती दिली. प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. ए. के. घाटगे, डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील व डीन डॉ. एस. के. शिरगांवे यांनीही मार्गदर्शन केले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा डॉ. सपना आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. शिवतेज पाटील यांनी, तर आभार प्रा. आर. के. वळसंग यांनी मानले.

मार्गदर्शन करताना कार्यकारी संचालक रवी आवाडे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा