इचलकरंजी महानगरपालिका नगर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूकीत इचलकरंजी शहर फेरीवाले विकास आघाडी विजयी.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका नगर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूकीत इचलकरंजी शहर फेरीवाले विकास आघाडी विजयी.
इचलकरंजी:
   इचलकरंजी महानगरपालिका नगर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक २०२४ ची प्रक्रिया महानगरपालिका उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांच्या नियंत्रणाखाली घेणेत आली.
       आजच्या निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये एकुण ८४२ मतदारा पैकी ६०८  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७२ % मतदान झाले आहे.
        या निवडणुकी मध्ये  एकुण ८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती.  यापैकी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील एक आणि एक जागा विकलांग दिव्यांग प्रवर्गातील एक जागा बिनविरोध झालेली आहे.
तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सदर प्रवर्गातील एक जागा रिक्त राहणार आहे.
         उर्वरित ५ जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
  सर्व साधारण प्रवर्गातून मनिष राजशेखर नायडू ४९५ व राकेश पुंडलिक माळी  ४७२ मते घेऊन विजयी झाले तर खलिल शमशुद्दीन झारे यांना ९३ व रियाज रमजान सुंकंद यांना ८४ मते मिळाली तर ९ मते बाद झाली.सर्व साधारण प्रवर्ग महिला प्रवर्गातून  लक्ष्मी हणमंत कांबळे या ४८९ मते घेऊन विजयी झाल्या तर निलोफर इकबाल शेख यांना १०६ मते मिळाली तर १३ मते बाद झाली.
इतर मागासवर्ग प्रवर्गातून वसिम सलाउद्दीन बागवान ४८५ मते घेऊन विजयी झाले, विरोधात निहाल शहाजान बागवान यांना १०५ मते मिळाली व १८ मते बाद झाली.अल्पसंख्याक प्रवर्गातून समिर दादासाहेब सोलापूरे हे ४६७ मते घेऊन विजयी झाले असून विरोधात सोहिल रफिक रोले यांना ७४ आदिलशहा गणी कमाल यांना ५१ मते पडली तर १६ मते बाद झाली.
  अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून वेणुताई नामदेव पोवार यांची तर विकलांग दिव्यांग प्रवर्गातूनसुवर्णा कृष्णा कुसाळे यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडणुकीसाठी उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांच्या सह सहा.
निवडणूक निर्णय तथा सहा.आयुक्त अधिकारी विजय राजापुरे आणि केतन गुजर,मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांचेसह
महानगरपालिकेचे विविध अधिकारी कर्मचारी,शिक्षक  सहभागी झाले होते .
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून जुन महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील.इमनपा आणि ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याने कार्यक्रमाचा शुभारंभ

Read More