श्रद्धा इन्स्टिट्यूटने रचला नवा इतिहास नीट परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत यश पोतदार महाराष्ट्रात पहिला.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रद्धा इन्स्टिट्यूटने रचला नवा इतिहास
नीट परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत यश पोतदार महाराष्ट्रात पहिला.
इचलकरंजी
शैक्षणिक क्षेत्रात नवनवे उपक्रम राबवत व सूक्ष्म अभ्यासाच्या जोरावर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मेडिकल व इंजिनिअरिंगचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने नीट २०२४ परीक्षेच्या निकालात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे.  संस्थेच्या आतापर्यंत लागलेल्या निकालाच्या निष्कर्षानुसार श्रद्धाच पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातील महाब्रँड आहे हे सिद्ध झाले आहे.  नीट २०२४ परीक्षेच्या निकालाने श्रद्धा इन्स्टिट्यूट म्हणजेच मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेशाचा राजमार्ग हे वाक्य संपूर्ण महाराष्ट्रात अधोरेखित झाले आहे. यावर्षी नीट परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूट चा लागलेला निकाल म्हणजेच संस्थेच्या प्रामाणिक कामकाजाची पोचपावतीच म्हणावी लागेल.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात येणाऱ्या नीट २०२४ परीक्षेवर एक नजर टाकली तर या परीक्षेला देशभरातून २४ लाख ६ हजार ७९ विद्यार्थी बसलेले होते.  तर महाराष्ट्रातून या परीक्षेला २ लाख ७९ हजार १०४ विद्यार्थी बसले होते. यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात या परीक्षेला विद्यार्थी बसल्यामुळे साहजिकच त्याच्या प्रवेशाचे मेरीट खूप जास्त होते. या परीक्षेत इन्स्टिट्यूटच्या तीन गुणी विद्यार्थ्यांनी ( यश पोतदार ७२० पैकी ७१५, अथर्व हावळ ७२० पैकी ७०५, सर्वेश दोरुगडे ७२० पैकी ७०५) आत्तापर्यंतच्या संस्थेच्या निकालात एक वेगळाच इतिहास रचला. सगळ्यात अभिमानाची गोष्ट अशी की इन्स्टिट्यूटचा गुणी विद्यार्थी यश पोतदार याचा ऑल इंडिया रँक १०९ आहे.  व त्यापेक्षा गर्वाची बाब अशी की, या विद्यार्थ्याने महाराष्ट्रातुन पहिला येण्याचा बहुमान पटकावला.   कॅटेगिरी नुसार या विद्यार्थ्यांचा देशात ३० वा क्रमांक लागतो.
या सगळ्या यशाकडे  पाहता इचलकरंजी हे एक छोटे शहर पण या शहरातील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करियर  डेव्हलपमेंटने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करीत शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला आहे व फक्त शहरी भागातीलच मुले नव्हे तर खेडोपाड्यातील मुलांच्या मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेशास श्रद्धा इन्स्टिट्यूट हाच राजमार्ग ठरला आहे. या इन्स्टिट्यूटच्या कोठेही शाखा नाहीत त्यामुळे एकाच ब्रँच मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात निकाल देणारी श्रद्धा इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील अग्रेसर संस्था ठरली आहे.
कोणतेही कार्य असे सहज पूर्णत्वास जात नाही. या यशामागे संस्थेच्या मॅनेजमेंटचा विशेष हातभार आहे.  मेहनत, सातत्य, चिकाटी, जिद्द, विश्वास ही मूल्ये संस्थेतील प्रत्येक व्यक्तीत  दडलेली  आहेत. कडक शिस्त, नियोजन, विशिष्ट क्लुप्त्या, सराव या गोष्टीच्या मुळापर्यंत गेल्यामुळे अशा प्रकारचे यश विद्यार्थी मिळवू शकले आहेत. तज्ञ प्राध्यापक वर्ग,उत्कृष्ट व्यवस्थापन,पालकांचा संस्थेवरील दृढ विश्वास, विद्यार्थ्यांचे प्रामाणिक अपार कष्ट यामुळे संस्थेचा पाया अधिकच भक्कम होऊन संस्थेची उंची दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा श्रद्धा इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेशासाठी वाढणारा कल हा अनेकांच्या संशोधनाचा विषय झालेला आहे.  यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे सर, समन्वयक श्री. एम. एस. पाटील सर,  सौ. सुप्रिया कौंदाडे,  सौ. संगीता पवार, श्री. अभिषेक तांबे, सौ. सृष्टी तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More