रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे सायकल वाटप
व आदर्श शिक्षक व अभियंता पुरस्कार वितरण
इचलकरंजी:
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी भवन नकोडा नगर येथे शिक्षक दिन तसेच अभियंता दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक आणि आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम रोटरी असिस्टंट गव्हर्नर ३१७० चे यतीराज भंडारी यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट ऑफिसर ३१७० चे प्रशांत कांबळे हे होते.
प्रशांत कांबळे यांनी, उपक्रमाचे कौतुक करून क्लबने हा एक चांगला उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे सांगितले. यतीराज भंडारी यांनी, विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होईल. तसेच पुरस्कारामुळे गुणवंताना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळेल असे नमूद केले. प्रमुख उपस्थिती म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ऑफिसर डिस्ट्रिक्ट ३१७० व रोटरी प्रोबस क्लब चे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी आपल्या मनोगतात क्लबच्या कार्याचा आढावा घेत भविष्यात असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य बाल शिक्षण परिषद कार्यकारिणी सदस्या सौ. वैशाली सिद्धाराम काडे यांना आदर्श शिक्षिक पुरस्कार तर इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन अध्यक्ष विक्रम हिंदुराव बुचडे यांना आदर्श अभियंता पुरस्कार देण्यात आला. पुरस्कर्त्यांनी या याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त करून कार्यक्रम कौतुक करून प्रोबस क्लबच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
स्वागत सेक्रेटरी रामचंद्र निमणकर यांनी तर प्रास्ताविक प्रोजेक्ट कमिटी चेअरमन सुनील कोष्टी यांनी केले. प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्तीचा परिचय सौ. शारदा कवठे, जुगलकिशोर तिवारी, सौ. विणा श्रेष्ठी, काशिनाथ जगदाळे यांनी करून दिला. मान्यवरांचा सत्कार क्लबचे अध्यक्ष अॅड. विश्वासराव चुडमुंगे व जयप्रकाश शाळगावकर यांनी केला. प्रोबस क्लबचे अध्यक्ष विश्वास चुडमुंगे यांनी वर्षभरात प्रोबस क्लब मार्फत महिला, युवा व ज्येष्ठ नागरिक इत्यादीसाठी विविध समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबवणार असल्याचे प्रतिपादन केले. या निमित्ताने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना यतीराज भंडारी ट्रस्ट व रोटरी सेंट्रल क्लबच्या सहकार्याने प्रोबस क्लबच्या माध्यमातून सायकल वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमास रोटरी सेंट्रल क्लबचे सेक्रेटरी नागेश दिवटे, प्रोबस क्लबचे उपाध्यक्ष सूर्यकांत बिडकर, जॉईट सेक्रेटरी प्रमोदिनी देशमाने, ट्रेझरर सौ विणा श्रेष्ठी, संचालक जयश्री चौगुले, गोविंद टिळंगे, किरण कटके, गजानन खेतमर, वैभव डोंगरे तसेच संतोष पाटील, सर्जेराव घोरपडे शिवबसू खोत, डेझी कुरणे, शंकर लाखे, अशोक देगावकर, माणिक मानकापुरे, बाळासाहेब रुईकर, डॉ. कुबेर मगदूम, गजानन खेतमर, हेमंत कवठे, प्रदीप लडगे, रमेश मर्दा, सौ रेखा कांबळे, संगीता शेंडगे सौ निर्मला मोरे, विजय हावळे आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
सायकल वाटप निधीसाठी प्रकाशराव दत्तवाडे, गजाननराव सुलतानपूरे, एम. के कांबळे, सर्जेराव घोरपडे, सौ वीणा श्रेष्ठी, इत्यादींनी मदत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शारदा कवठे यांनी केले व आभार प्रमोदिनी देशमाने यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800