इचलकरंजी :
जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय जिल्हास्तर व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच गोविंदराव हायस्कूल व श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल येथे पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये मुलींच्या १४,१७ व १९ वर्षाखालील गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या तीनही संघांनी प्रथम क्रमांक मिळवून तिहेरी मुकुट प्राप्त केला तर मराठी मिडीयम हायस्कूल, नारायण मळा, डी. के. टी. ई. या शाळेने मुलांच्या १४ व १७ वर्षाखालील गटात विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट प्राप्त केला.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज डी. के. टी. ई. यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेप्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेचे सहायक आयुक्त श्री विजय कावळे, सहायक आयुक्त सौ. रोशनी गोडे,
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर, गोविंदराव हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे मुख्याध्यापक आर. जी. झपाटे,
इचलकरंजी मनपा क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, क्रीडा समिती सदस्य शेखर शहा हे मान्यवर उपस्थित होते.
उपप्राचार्य व्ही. जी पंतोजी, एन. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, एस. व्ही. पाटील, एस. एस. तेली, आर. डी. पिष्टे, सौ. व्ही. एस. लोटके यांचे स्पर्धेसाठी सहकार्य लाभले.
सहायक क्रीडाधिकारी संजय कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक आकाश माने, सचिन खोंद्रे, स्पर्धाप्रमुख राहुल कुलकर्णी, संदीप लाड, बी. एस. माने, के. ए. पाटील, सौ. सोनल बाबर यांनी स्पर्धेचे नियोजन केले.
या स्पर्धेतील विजेत्या सर्व संघांची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800